devendra fadnavis : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेत शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, असं बोललं जातं आहे.
त्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना पटेल यांनी म्हंटलं आहे की, ‘पक्षाने जो आदेश दिला आहे तो मी पाळणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर अजिबात कोणाचा दबाव नाही. आणच्यासाठी भाजप आमची आई आहे. मरेपर्यंत पक्षासाठी काम करत राहू, पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे.”
पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ते अपक्ष लढणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. “मी अपक्ष लढणार नाही. मी पक्षाला माणणारा कार्यकर्ता आहे. मी अपक्ष निवडणूक लढणार नाही. मी ऋतुजा लटकेंना शुभेच्छा देतो”, असं पटेल यांनी स्पष्टच सांगितलं.
तसेच खुद्द ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पतीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. ‘माझ्या पतीचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याची पोचपावती मला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला,’ असं ऋतुजा यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मी सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते.’
दरम्यान, 14 ऑक्टोबरला मुरजी पटेल यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत ऋतुजा लटके यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र असं असलं तरी देखील अखेर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असून, शिवसेनेने या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…