Share

२०१७ मध्येच होणार होती भाजप- शिवसेना – राष्ट्रवादीची आघाडी; भाजप नेत्याचे फोडले बिंग

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात वेळोवेळी अनेक  मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप  झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप  ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही तर दुसरीकडे  महाविकास आघाडीतील नेतेही भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाही. राजकारणामध्ये सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात टीका-टिप्पणी, आरोप- प्रत्यारोप होतात यात काही नवीन नाही.

यातच आता राज्याच्या राजकारणात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सन २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची  चर्चा झाली होती. मंत्रीपदेही ठरली होती. मात्र, राष्ट्रवादीने युती करण्यास नकार दिला, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला. आम्ही तेव्हा म्हटले की, तीन पक्षांचे अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण २०१९ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली, असे आशिष शेलार यांनी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.

यावेळी आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला. राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही, असे २०१७ मध्ये म्हटले होते आणि आता पाहा २०१९ ला कसे जमले आहे. आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जसे,  ‘जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात, किती वर्षात बदलते याचा साक्षीदार भाजप आहे, असे म्हणत शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

२०१७ मध्येच राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेऊन राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढवायच्या याची सगळी चर्चा भाजप वरिष्ठ नेतृत्वासह झाली होती, असे शेलार म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे नेते हे राजीनामे खिशात ठेवल्याची जहरी भाषा करत होते. तेव्हा राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेताना खात्यांचं वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी चर्चा झाली होती असेही ते म्हणाले.

शिवसेनेला सरकारमधून दूर करु नका, असा आदेशही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपची प्रामाणिक भूमिका होती असंही ते यावेळी म्हणाले. पुढे म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजपचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते. शेलरांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणार अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
“जाहिर सभा, उत्तर सभा आता वाट ‘पुरवणी’ सभेची; प्रश्न राष्ट्रवादीचे अन् उत्तर BJP च्या C टीमचे”
समान नागरी कायदा असंवैधानिक, पर्सनल लॉ बोर्ड म्हणाले, ‘मुस्लिम कधीच त्याला स्वीकारणार नाहीत’
देशातील पहिले असे गाव जिथे सर्व घरांमध्ये सौरउर्जेपासून बनवतात जेवण, पण हे कसं शक्य झालं?
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी शरद पवार अडचणीत; चौकशी आयोगाने दिले ‘हे’ आदेश

 

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now