Share

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिंदे गटाचा वरचष्मा; ठाकरे गटाला मोठा धक्का

राज्यात विधानपरिषद निवडणूक झाल्यापासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील या निवडणुकीचे काल निकाल लागले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काल लागला. या २७१ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचं दिसून आलं.

२७१ पैकी भाजपने ८२ तर शिंदे गटाने ४० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे. राज्यात ५३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल जिंकून आले आहे.

शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमने-सामने आला. काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपा ८२, राष्ट्रवादी ५३, शिंदे गट ४०, शिवसेना २७ तर काँग्रेस २२ जागांवर विजयी झाले.

या निवडणुकीत इतरांना ४७ जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाने मराठवाड्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. धुळे जिल्ह्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीत शिवसेनेला ३ हून अधिक, शिंदे गटाला २० हून अधिक तर भाजपाने १५ हून अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. काँग्रेसलाही १० ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे.

औरंगाबादेत शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांकडे सगळ्यांचे लक्ष होते. शिंदे गटाने वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १२ जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. तर सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now