शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.(bjp praveen darker conterversial statement about sanjay raut)
सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. “पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठी ठेवलेलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
या आरोपांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊत यांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे”, असं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, “संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊत यांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे”, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
भाजप आमदार प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, “संजय राऊत राज्यातील पोलिसांना बुळचट म्हणतात. मग तुमचंच सरकार आहे. तर पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निलंबित करण्याची धमक तुम्ही दाखवणार का?”, असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केलेल्या आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. “राज्यातील विरोधी पक्षाने दळभद्रीपणाचा कळस केला आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? भाजपने सदावर्ते यांना आर्थिक पाठबळ दिल आहे”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. “पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठी ठेवलेलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
या आरोपांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊत यांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे”, असं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, “संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊत यांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे”, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
भाजप आमदार प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, “संजय राऊत राज्यातील पोलिसांना बुळचट म्हणतात. मग तुमचंच सरकार आहे. तर पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निलंबित करण्याची धमक तुम्ही दाखवणार का?”, असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केलेल्या आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. “राज्यातील विरोधी पक्षाने दळभद्रीपणाचा कळस केला आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? भाजपने सदावर्ते यांना आर्थिक पाठबळ दिल आहे”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘यंदा मुंबई इंडियन्स सर्वात कमकुवत टीम’ रोहित शर्मावर हा दिग्गज खेळाडू नाराज, बुमराहवरही केलं भाष्य
“पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही”; सरकारची घोषणा
‘या’ भारतीय क्रिकेटरवर कोसळला दुख:चा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने अर्ध्यावर सोडली IPL