राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे सध्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपच एकमेकांचे मोठे विरोधक असल्याचे दिसत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत होते. (bjp mp sujay vikhe patil shoking statement)
भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. असे असतानाचा आता भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे. काहीही झालं तरी आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केले आहे.
नगरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यावेळी सुजय विखे पाटलांनी शिवसेनेबद्दल हे वक्तव्य केले आहे. तसेच मी खासदार म्हणून निवडून येण्यात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे, असेही सुजय विखे पाटलांनी म्हटले आहे.
मी खासदार बनण्यात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे. याची मला जाणीव आहे. म्हणूनच गेल्या तीन वर्षांत मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याविरोधातही कधी बोललो नाही, असे सुजय विखे पाटलांनी म्हटले आहे.
तसेच मी उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही, पण मी आजही एका मतावर ठाम आहे. माझं आजही एक मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरेंनी वेळीच सावध व्हायला पाहिजे, असे सुजय विखे पाटलांनी म्हटले आहे.
सुजय विखे पाटलांनी भाजपमधून शिवसेनेत जाणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलही वक्तव्य केले आहे. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेते गेले आहे, पण त्याची मला खंत नाही. तसेच जेव्हा शिवसेनेवर संकट येईल तेव्हा मी शिवसेनेला एकटं नाही सोडणार. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आणि पंतप्रधान मोदींनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल, असा बोलणारा मी एकमेव खासदार असेल, असेही सुजय विखे पाटलांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार; शिवसेनेच्या पराभवानंतर संभाजीराजेंची बॅनरबाजी
बच्चू कडूंनी सांगीतले महाविकास आघाडीचा खेळ नेमकी कुठे बिघडला; अपक्ष नाही तर….
‘भाऊ तुमच्यामुळेच मी खासदार झालो’; विजयाचा जल्लोष सोडून महाडिक गेले जगतापांच्या भेटीला