Share

माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी

देशातील रस्त्यांवर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास प्रत्येक व्यक्तीला दंड भरावा लागतो. पण काही जण दंड भरण्यास नकार देतात आणि उलट पोलिसांशी अरेरावी देखील करता. अशीच एक घटना कर्नाटकमधील बंगळूरमधून समोर आली आहे. कर्नाटकमधील भाजप(BJP) आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (BJP MLA’s daughter angry on police)

या व्हिडिओमध्ये ती पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू कारमधून तिच्या मित्रांसोबत कुठेतरी जात होती. त्यावेळी ती ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे निघाली होती. यावेळी पोलिसांनी तिला थांबवले. त्यावेळी त्यानंतर भाजप आमदाराच्या मुलीने पोलिसांनी धाक दाखवण्यास सुरवात केली.

भाजप आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीने रस्त्यावर तमाशा करत पोलिसांशी वाद घातला. “मला जायचं आहे. माझी कार थांबवू नका. ओव्हरटेक केल्यामुळे तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही ही गाडी बेजबाबदारपणे चालवत नव्हतो. मी भाजप आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी आहे”, अशा शब्दांत तिने पोलिसांशी दमदाटी केली आहे.

यानंतर पोलिसांनी त्या भाजप आमदाराच्या १० हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूमधील राजभवनाजवळ घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवेळी काही स्थानिक पत्रकार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी तरुणीने त्या स्थानिक पत्रकारासोबत देखील गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दंड ठोठवल्यानंतर तरुणी जागेवर आली. “माझ्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नाहीत. मला घरी जाऊ द्या”, अशी विनंती भाजप आमदाराच्या मुलीने पोलिसांना केली. पण पोलिसांनी ही विनंती अमान्य करत तिला दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तिच्या मित्राने या प्रकरणात मध्यस्थी केली आणि दंड भरला.

यानंतर पोलिसांनी भाजप आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीला जाऊ दिले. यावेळी उपस्थित असलेल्या काही स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करत पोलिसांचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
काँग्रेसची तीन मतं होणार रद्द? एकमेव जागाही धोक्यात आल्याने काँग्रेसला फुटला घाम
हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो
ऋषभ पंतची कॅप्टनसी पाहून झहीर खान संतापला, म्हणाला, ‘या’ गोष्टीवर त्याने लक्ष दिलं पाहिजे होतं

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now