गेल्या काही दिवसांपासून अजानवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यात आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजानसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, असं वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत(Press Conference) भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केलं आहे.(bjp mla conterversial statement on ajan)
या पत्रकार परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “पूर्वीच्या काळी घड्याळं, मोबाइल नव्हते म्हणून नमाज पठणाची वेळ समजण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. आज परिस्थिती वेगळी आहे. आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाइल आहेत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत, अशी भाजपची भूमिका आहे”, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
या पत्रकार परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हिंदू सणांना केल्या जाणाऱ्या विरोधावर देखील भाष्य केलं. यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “महाराष्ट्रात दिवाळीला, होळीला, गणपतीच्या मिरवणुकीला आणि गुडीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध केला जातो, रामनवमीला विरोध केला जातो तर अजानला विरोध का नाही?”, असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.
अजानबाबत बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. भारतीय जनता पक्षाचा त्याला विरोध आहे. आम्ही धर्माला विरोध करत नाही. पण धर्माच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धर्म बळकावण्याचं काम करत आहेत त्याला आमचा विरोध आहे”, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजानबंदीबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या व्हिडिओची क्लिप मी पाहिली आहे. खरं म्हणजे अजान एक प्रार्थना आहे. आता ती नुसतीच की लाऊड स्पीकरवर हा विषय आहे”, असे मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या की, “मला सांगा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. तिथे मशिदी नाहीत का? मग तिकडे मशिदीवर लाऊड स्पीकर नाहीत का? त्यांच्या निवडणुकांच्या आगोदर हा विषय तुम्हाला का सुचला नाही?”, असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी भाजपाला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
जन्मताच बाळाला होती दोन डोकी आणि तीन हात, डॉक्टरांनी सांगितलेले कारण ऐकून आईला बसला धक्का
संशोधकांना मोठं यश, प्रेग्नेंसी टाळण्यासाठी आता महिला नाही तर पुरूष घेणार गर्भनिरोधक गोळी
मोठी बातमी! ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र झाला मास्कमुक्त, जाणून घ्या कोणकोणते निर्बंध हटवले