शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.(bjp make best plan to take mla to vidhansabha)
पण आता या सर्व बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून मुंबईत आणण्यासाठी भाजपने एक विशेष मोहीम आखली असल्याची माहिती मिळत आहे. या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन एअरलिफ्ट’ असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भाजपकडून सर्व बंडखोर आमदारांना मुंबईत आणले जाणार आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन एअरलिफ्ट’ या मोहिमेसंदर्भात काही खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, “ऑपरेशन एअरलिफ्ट या मोहिमेअंतर्गत सर्व बंडखोर आमदारांना विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. या सर्व आमदारांना राजभवनापर्यंत नेण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करण्यात येणार नाही.”
“सर्व बंडखोर आमदारांना रस्ते मार्गाने राजभवनापर्यंत नेट असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून या बंडखोर आमदारांना हेलिकॉप्टरद्वारे राजभवनापर्यंत नेले जाणार आहे. भाजपकडून या विशेष मोहिमेसाठी काम केले जात आहे”, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण मुलाखतीत पुढे म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने गेमप्लॅन तयार केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपचा हाच प्लॅन आहे. शिवसेनेची ताकद कमी झाल्यानंतर भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होऊ शकते”, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
भाजप सध्या सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. भाजप नेते या बंडखोरीबद्दल प्रसार माध्यमांवर वक्तव्ये करताना फार कमी दिसत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
..अन्यथा झेंडे काढून दांडे हातात घेऊ, क्रांती मोर्चाचा तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा
बंडखोरांना राजभवनात आणायला भाजपने आखला ‘हा’ प्लॅन; राज्यातील बड्या नेत्याचा खुलासा
”तुमच्यात धमक असेल तर राजीनामे द्या अन् आपआपल्या मतदारसंघातून निवडून या”