bjp loksabha election mission 45 | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला हे शक्य होताना दिसून येत आहे. काही राज्य सोडली तर बाकीच्या राज्यांमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. लोकसभेत सुद्धा भाजपला बहुमत आहे.
अशात भाजप आता एका नव्या मिशनच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ते मिशन म्हणजे मिशन ४५. महाराष्ट्रातील बारामतीतून या मिशनला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रभाव असलेल्या बारामतीवर भाजप आता लक्ष्य ठेवून आहे.
१६ आणि १८ ऑगस्टला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर आहे. बारामती मतदार संघातून आतापर्यंत शरद पवार, अजित पवार, आणि सुप्रिया सुळे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यामुळे आता बारामती जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसायला सुरुवात केली आहे.
सीतारामन या बारामतीत तीन दिवस मुक्कामी असणार आहे. या मिशनसाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन केलं आहे. तर सीतारामन यांच्याआधी केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे ११ ते १३ ऑगस्टच्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
मिशन ४५ अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील १६ जागा निवडल्या आहेत. यापैकी १० जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, हातकंगले, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, मुंबई, रायगड, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, औरंगाबाद, पालघर, कल्याण, बारामती, शिरुर, शिर्डी, सातारा या जागा भाजपने निवडल्या आहे.
दरम्यान. राज्यात आता शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आगामी लोकसभा निवडणूका या २०२४ मध्ये असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Dipak Kesarkar: १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करा; केसरकरांच्या लोटांगणानंतरही राणे आक्रमक
शिवसेनेचे ‘हे’ दोन नेते मातोश्रीवरच एकमेकांना भिडले; उद्धव ठाकरे दोघांनाही खडसावत म्हणाले…
Shahrukh khan: ज्या मराठी अभिनेत्याला शाहरुखच्या वॉचमननं दारातही उभं केलं नव्हतं, आता तोच करतोय किंग खानसोबत काम