गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.
अशातच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावरुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जहरी शब्दात निशाणा साधला आहे. ‘भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का? भाजपचा एकंही नेता भ्रष्टाचारी नाही का?,’ असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. ते याबाबत मुंबई प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘ED आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे. EDच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचं, आता भाजप ईडी ने सत्तांतर करत असल्याचा गंभीर आरोप कडू यांनी भाजपवर केला आहे.
दरम्यान, परब यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना पुढे कडू म्हणाले,’इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही करण्यात आलेली कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा कडू यांनी भाजपला दिला.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर आता परब यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांच्या अडचणींमद्धे वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर संभाजीराजेंचाही गौप्यस्फोट; म्हणाले, शिवरायांना स्मरून सांगतो…
VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव
…त्यामुळे सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली; मनसेने सांगितला इतिहास