पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही. यावरूनभाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टोलेबाजी करण्यास सुरूवात केली आहे.
गोवा और युपी में म्याव म्याव की आवाज नहीं सुनाई दीं भाई- नितेश राणे
नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गोवा और युपी में म्याव म्याव की आवाज नहीं सुनाई दीं भाई, व्हेरी सॅड, बहुत दुख हुआ, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गोवा आणि युपीमध्ये म्याव म्यावचा आवाजच ऐकू नाही आला, भाई. व्हेरी सॅड, खुप दुख झाले, असं म्हणत नितेश राणेंनी टोला लगावला आहे. शिवसेनेला टोला लगावला आहे.
शिवसेना म्हणजे ‘अंगापेक्षा भोंगा’- निलेश राणे
नितेश राणेंच्या या टोलेबाजीवर अद्याप शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नाही पण निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टोलेबाजी करत एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, गोव्यात शिवसेनेला ०.२५ टक्के मतदान, उत्तर प्रदेश मध्ये ०. ०२ टक्के मतदान, शिवसेना म्हणजे अंगापेक्षा भोंगा, असं ट्विट करत त्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
गोवेकरांनी लाज काढली- अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेची युपीतील आणि गोव्यातील परिस्थितीवर त्यांनीही टोलेबाजी करत एक ट्विट केले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, हजरत टीपू समर्थकांना गोव्यात नोटापेक्षा कमी मतं.., गोवेकरांनी लाज काढली.
उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊतजी गोव्यात शिवसेना कुठं आहे? – किरीट सोमय्या
किरीट सोमय्यांनीही शिवसेनेला यावरून टोला लगावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊतजी गोव्यात शिवसेना कुठं आहे!!??” असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
कोणताही पक्ष राज्याबाहेर जात असताना संघर्ष हा करावाच लागतो- संजय राऊत
दरम्यान, शिवसेनेच्या या कामगिरीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पार्श्वभूमीवर योगींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी आहे. अजूनही उत्तर प्रदेशात मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हातात येतील.
त्यानंतर काहीही बोलणे योग्य ठरेल. अखिलेश यादव भाजपला टक्कर देतील एवढं नक्की आहे असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशातही उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण त्यापैकी एकाही उमेदवाराला खास काही करता आलं नाही. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या लोकांनी खुप मेहनत केली. ही शिवसेनेची सुरूवात होती. कोणताही पक्ष राज्याबाहेर जात असताना संघर्ष हा करावाच लागतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
बड्या बड्या बाता मारणाऱ्या शिवसेनेची गोव्यात लाजिरवानी हार; मिळाली नोटापेक्षाही कमी मते
शवागारात गार्डसोबत भयानक prank करणे पडले महागात, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
या’ राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनपीपी एकत्र
लोकं संतापली! कपिल शर्मा शोवर बहिष्काराची मागणी; ‘हे’ आहे त्यामागचे कश्मीर कनेक्शन