मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्याने भाजप नेते आता सत्तेत आले आहेत.
तर दुसरीकडे सध्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच एक व्यक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोडमध्ये आयोजित सभेला संबोधित करताना दानवे यांनी एक मोठं विधान केलं आहे. दावने यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोडमध्ये सभेदरम्यान आमदार अब्बुद सत्तार (Abdul Sattar) हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे हे हिंदुत्ववादी राजकारण करतात. ते हिंदुत्ववादी पार्टीचे आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले.
पुढे बोलताना सत्तार यांनी विकास निधीसाठी पैसे व विकासकामांसाठी आभार मानले. याचबरोबर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोन नेते एकत्र आले तर काय होऊ शकते हे लोकांना चांगलेच माहिती आहे, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.
सत्तार यांच्या नंतर दानवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ‘सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पैसे घेतले आणि लखपती झाले. मात्र, मी लोकपती असल्याचे’ दानवे म्हणाले. दानवे यांच्या या विधानाने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पैशांचा मुद्दा राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्येक बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याचा आरोप केला होता. ५० खोके दिल्याने आमदारांनी बंड केल्याचे ते म्हणत होते.