सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मिलक यांच्यावरील ईडी (ED) कारवाईनंतर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र तरीदेखील ठाकरे सरकारने मलिक यांचा राजीनामा न घेतल्या भाजपाने आक्रमक पवित्रा घेत सरकरविरोधात आंदोलने केली आहेत.
तसेच यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एक आगळी वेगळी मागणी केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करा, अशी मागणी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
#KashmirFiles @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/3X3hzwiPMF
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 13, 2022
राणे यांनी ट्विट म्हंटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट राज्यातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन राणे केलं आहे.
सगळीकडे सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘पवारांचे दाऊदवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा’
भाजपचा केंद्रीय मंत्री राहीलेला ‘हा’ अभिनेता तृणमूलकडून खासदारकीच्या रणांगणात उतरणार; ममतांची घोषणा
बाप आहे की कसाई? बायकोवरती आलेल्या रागातून एक वर्षाच्या मुलीला जिवंत खड्ड्यात पूरलं
आम आदमी पक्षामुळे नेमके कोणाचे नुकसान? गोपीनाथ मुंडेंनी आधीच दिलं होतं ‘हे’ उत्तर