Share

‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन,’ भाजपाची जहरी टीका

partha pawar

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका अजून 2 वर्षांनी आहेत. मात्र आतापासूनच मावळ लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघामधून शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले होते.

तर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र त्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा जवळपास सव्वा दोन लाखाच्या फरकाने पराभव केला होता.

पार्थ पवार यांच्या पराभवाचा राष्ट्रवादी मोठा धक्का बसला होता. मात्र आता राजकीय समीकरण बदलली आहेत. भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघामधून कोणाला तिकीट मिळतय हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच 2 वर्ष बाकी असताना देखील पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेनं पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा यासंदर्भातील मागणीवरुन आतापासून राजकारण रंगू लागलं आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील दोन मुख्य घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

असे असताना आता यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन आहे. असं असले तरी पिंपरी चिंचवड लोकसभा सीट राष्ट्रवादी ढापणार आणि शिवसेनेच्या बरणेंना घरी पाठवणार,’ असे म्हणत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून देखील यावर प्रतिक्रिया आली असून सेनेने मात्र राष्ट्रवादीची मागणी फेटाळून लावली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. ‘मावळचे श्रीरंग आप्पा बारणे खासदार आहेत आणि तेच राहतील. पार्थ पवार तरुण आहे, त्यांचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर बोलू,’ असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
युद्धादरम्यान रशियामध्ये कंडोमची विक्री प्रचंड वाढली; धक्कादायक कारण आले समोर
..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा
बिग ब्रेकींग! ईडीने आता मातोश्रीलाच घेरले, ठाकरेंच्या भावाची कोट्यावधींची संपत्ती जप्त
“राष्ट्रवादीच्या अशा फालतू नेत्याला भरचौकात फटके मारायला पाहिजेत”, शिवजयंतीवरून मनसे आक्रमक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य लेख

Join WhatsApp

Join Now