Share

‘संभाजीराजे.. पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?,’ भाजपचा संतप्त सवाल

bjp flag

‘उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ असा निरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांकडे छत्रपती संभाजीराजेंना देण्यासाठी निरोप पाठवल्याची बातमी आता समोर येत आहे. यामुळे आता संभाजीराजें उद्या शिवबंधन बांधणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे भाजप नेते निलेश राणेंनी ट्विट करत ‘लाथ मारा त्या खासदारकीला,’ असं आवाहन केलं आहे. ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, ‘पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला,’ असं त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

 

ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, ‘आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती सध्या मिळत आहेत. यामुळे आता शिवसेनेच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याचबरोबर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे.

यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे त्याच सोबत राज्याचे लक्ष आता महाविकास आघाडी सरकारकडे याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लागलं आहे. तसेच शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे.

यामुळे आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ तासाभरापूर्वीच संभाजीराजेंच्या भेटीला हॉटेल ट्रायडंट येथे गेलं होतं. सुमारे पाऊण तास संभाजीराजेंशी सखोल चर्चा केली. ‘संभाजीराजेंनी सेनेत पक्षप्रवेश करावा,’ असा निरोप मुख्यमंत्र्यांनी राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून उर्फी पोहोचली पार्टीत, युजर्स म्हणाले, ‘ही बसणार कशी?’
ब्राम्हण संघटनांनी घेतली शरद पवारांची भेट, केल्या ‘या’ तीन मागण्या; शरद पवार म्हणाले…
सोपा झेल सोडला आणि डीआरएसही नाही घेतला, चाहत्यांनी पंतचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले..
भुल भुलैयासमोर चित्रपट फ्लॉप झाला तरी कंगनाने केले कार्तिक आर्यनचे अभिनंदन, म्हणाली…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now