Share

नवनीत राणा एका मोठ्या आजाराने त्रस्त; MRI रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

navnit rana

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. पण नवनीत राणा यांची सुटका झाल्यापासून त्या आजारी आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मानेसह शरीराच्या अनेक भागांच्या वेदनांसोबतच स्पॉन्डिलायटीसची तक्रार केली आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला. नवनीत राणा सध्या स्पॉन्डिलायसिस या आजाराने त्रस्त आहेत. तसेच डॉक्टरांनी फुल बॉडी चेकअपही केलं आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे तब्बल 13 दिवस तुरुंगात होते. तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. दरम्यान, नवनीत राणा यांच्या स्पॉन्डिलायसिस आजाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एक सामान्य आजार आहे, एक प्रकारे याला गठिया रोग असेही म्हणतात.’ अँकिलोझिंग स्पॉडिलोसिस (एएस) हा सांध्यांना सूज आल्यामुळे जडणारा एक वातविकार आहे, जो प्रामुख्याने पाठीच्या मणक्यावर आणि सॅक्रॉइलिक जॉइंट्स म्हणजे आपला मणका जिथे पेल्व्हिसशी जोडला जातो त्या भागावर परिणाम करतो.

या आजारामुळे कंबरेपासून वेदना सुरु होते. सोबतच पाठ आणि मानेमध्ये जडपणा जाणवतो. तसेच शरीराच्या बहुतांश भागात देखील वेदना होतात. यामुळे मणक्यातील जडपणा राहतो. धक्कादायक बाब म्हणजे काहीवेळा रुग्णांना एवढ्या जास्त वेदना होतात की शस्त्रक्रिया देखील करावी लागते.

दरम्यान, याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पॉन्डिलायसिसमध्ये वेदना प्रामुख्याने कंबरेपासून सुरु होते. हे वयानुसार हा आजार जास्त त्रास देऊ लागतो. यामुळे अनेकदा थेट तुमच्या हृदयावरही परिणाम होतो. तसेच सहसा 45 वर्षांखालील पुरुष आणि महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या
आठ वर्षे कुठे होतात? खा. रक्षा खडसेंवर गावकरी भडकले; रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय
केएल राहुलसोबत लग्नाबाबातच्या बातम्यांवर अथिया शेट्टीने सोडले मौन, म्हणाली, नवीन घरात शिफ्ट..
पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा
सपना चौधरी-वीर साहूचा टेरेसवरील रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल, सोशल मिडीयावर खळबळ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now