गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील जनता विरुद्ध परप्रांतीय असा वाद पाहायला मिळत आहे. परप्रांतीय लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात येऊन नोकरी करत आहे. अशात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे वाद निर्माण होत आहे. (bjp leader letter to cm yogi adityanath)
अशातच भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी लिहिलेले एक पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच या पत्रामुळे आता एक नवीन वाद निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कृपाशंकर यांनी ते पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे.
उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी शिकवली पाहिजे. यामध्ये मराठी प्रेम नसून उत्तर प्रदेशातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी मराठी शिकणे गरजेचे आहे, मराठी शिकली तर उत्तर प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवणे सोपे होईल, असे कृपाशंकर यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यांमधून मोठ्या संख्य़ेने लोक येत असतात. तसेच ते राज्यात नोकऱ्या मिळवत असतात. त्यामुळे राज्यातील रोजगारांवर मर्यादा येते. तसेच राज्यातील तरुणांना रोजगाराचा योग्य मोबदलाही मिळत नाही. त्यामुळे अनेकदा परप्रांतीय आणि राज्यातील तरुणांमध्ये वाद पाहायला मिळत असतो.
आता कृपाशंकर यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी आल्यास महाराष्ट्रात त्यांना चांगली नोकरी उपब्लध होऊ शकते, असे पत्रात म्हटले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कृपाशंकर यांनी केलेली ही मागणी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या पत्राबाबत योगी सरकारही विचार करत आहे, असे म्हटले जात आहे. पण या पत्रामुळे एक वादही निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच लवकरच महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या पत्राचे परीणाम निवडणूकीवरही होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: सलमानने त्याचं गाणं ऐकताच मारली त्याला मिठी, वाचा जगातील सर्वात छोट्या गायकाबद्दल…
जर हेच मी तुमच्या आई-बहिणींबद्दल लिहीले तर…, ट्रोलर्सच्या ‘त्या’ कमेंटवर भडकला अर्जुन कपूर
निकाल काहीही आला तरी निराश होऊ नका, बारावी नापास झालेले ‘हे’ दिग्गजही आहेत आयुष्यात टॉपर