आज परिवहन मंत्री अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे दापोलीत दाखल झाले. एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि निलेश राणे शेकडो कार्यकर्त्यांसह दापोली दाखल झाले.
तसेच शक्तिप्रदर्शन केल्यानंतर सोमय्या, राणे दापोलीस पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांशी चर्चा केली. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमय्यांना नोटीस बजावली आहे. मात्र सोमय्या मुरूडला रिसॉर्टवर जाणार या भूमिकेवर ठाम आहेत.
त्यानंतर सोमय्या हे निलेश राणे यांच्यासोबत रिसॉर्टकडे निघालेले असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या हे दापोली पोलीस स्टेशनच्या दारातच आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत.
यानंतर सोमय्या हे पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि त्यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले, “निलेश राणे यांनी आपल्याला सांगितलं आहे की किरीट सोमय्यांची हत्या.. असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशनचे, रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचं झालं आहे असं दिसत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी मुरूडला गेलो तर माझी हत्या होऊ शकते, माझा घातपात होऊ शकतो, अशी माहिती मला पोलीसच देत आहेत. मला पोलीसच घाबरवत आहेत, पोलीस कुणाच्यातरी दबावात येऊन मला अडवत आहेत, मात्र जोपर्यंत मंत्री अनिल परब यांच्या वर गून्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून हलणार नाही.’
सोमय्या पुढे म्हणाले, ‘शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमचा घातपात करणार आहे हे पोलीस अधिक्षकांनी मला लिखीत स्वरुपात दिले आहे. आम्हाला रिसॉर्टवर जाऊ दिले जात नाही. माझी हत्या करण्याच्या कटात पोलीस अधिक्षक सहभागी होत आहेत.’ पोलीस गनिमी काव्याने तुमची हत्या करु शकतात असे सांगतात,” असे सोमय्या म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
“माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं”
IPL सुरु होताच जिओने आणला जबरदस्त प्लॅन, आता फुकटात बघा संपूर्ण IPL
रिषभ पंतकडे भारताचा कर्णधार होण्याची क्षमता; संघाला दोनदा विश्वकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनचं मोठं विधान
पोस्टमार्टम करताना महिलेच्या अंतर्वस्त्रात डॉक्टरांना असं काही आढळलं, ज्याने सर्व प्रकरणाचा झाला खुलासा