Share

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मैदानात, ‘या’ बड्या नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी, चर्चांना उधाण

devendra

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कोणाला संधी देणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं.

अखेर काल राज्यसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. अनिल बोंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील  आहे.

याचबरोबर, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे आता राज्यसभा निवडणुकीसाठी चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी अचानक तिसरा उमेदवार म्हणून भाजपने धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले आहे.

काही दिवसांपासून तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र कोल्हापूरमध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी धनंजय महाडिक मैदानात उतरले आहे. भाजपने तिसरा उमेदवार रिगणात उतरविल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असेल.

दरम्यान, संभाजीराजेंना डावलून शिवसेनेनं जिल्हाध्यक्ष संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी धनंजय महाडिक मैदानात उतरले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे बोलले जातं आहे.

राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र पुन्हा एकदा भाजपने मंत्री विनोद तावडे  यांना डच्चू दिला आहे. काही दिवसापासून विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा तावडे यांचा पत्ता कट केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं
मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…
गुजरातने राजस्थानला हरवून पदार्पणातच पटकावले आयपीएलचे विजेतेपद; हार्दीकने करून दाखवलं..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now