Share

इंधन दर कपातीनंतर देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे कौतुक करत राज्य सरकारकडे केली ‘ही’ विनंती

devendra fadanvis

गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांची ओरड सुरू होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि काल पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये कपात केल्याची घोषणा केली.

काल केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे आता पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने दिला.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. याबाबत फडणवीस यांनी ट्विट करुन मोदींचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी असल्याचं म्हटलं. यासोबतच, महाराष्ट्र सरकारनेही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करावेत, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

पुढे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सर्वसामान्यांची काळजी करतात. सातत्याने गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, राज्य सरकारनेही इंधनदरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, पुढे फडणवीस म्हणतात, ‘मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे असे सांगत, गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात, असेही म्हटले आहे.

तर दुसरीकडे मोदींनी पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झालेत. कालच केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत, अशी घोषणा केली. आता केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आणखी कपात करावी यासाठी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलचा अबकारी कर प्रतिलिटर 18 रुपये 42 रुपये इतका वाढविला होता. आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील 18 रुपये 42 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-
पतीने सामना जिंकवताच मुलीला कडेवर घेऊन नाचू लागली अश्विनची पत्नी, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल
बाॅलीवूडला मागे टाकत ‘धर्मवीर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमाई ऐकून डोळे पांढरे होतील
लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा स्फोट, नवरदेवाने गमावले दोन्ही डोळे, वाचून हादराल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now