गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. (bjp leader devendra fadnavis for goa election
याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. मनोहर पर्रिकरांच्या नावावर आपण मते मागता, मात्र त्यांच्या मुलाला तिकीट देत नाही, असे पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले. याबाबत बोलताना त्यांनी उत्पल पर्रीकर यांच्या तिकीटाबाबत खुलासा केला आहे.
ते म्हणाले, ‘उत्पल पर्रिकर यांना चार जागा दिल्या होत्या. त्यापैकी एक जागा लढावी आणि नंतर पुढच्या निवडणुकीत पणजीमधून तिकीट देऊ असे म्हंटले होते. पण त्यांनी ते मान्य केलं नाही. आम्ही उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारलं नाही. तर उत्पल यांनी भाजपचे तिकीट नाकारले ही वस्तूस्थिती आहे. उत्पल यांच्या मागे कोण आहे हे आम्हालाही माहित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली.
तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी खूप मोठी रिस्क घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारच्या काळात ५ लाख ३५ हजार कोटींचा बँक घोटाळा, राहुल गांधींचा गौप्यस्फोट
असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकदिवस हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल
वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?
राहूल बजाज आमच्यासाठी देव होते, त्यांनी लाखो कुटुंबे उभी केली म्हणत कामगार ढसाढसा रडले