Share

Uddhav Thackeray : …त्यामुळे ‘मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या

uddhav thakare

Uddhav Thackeray: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेने पक्षाविरोधात कार्य केल्याने १६ आमदारांची निलंबनाची मागणी केली. हे प्रकरण न्याप्रविष्ट असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून येते. त्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन देणारे शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्यासह यशवंत जाधव यांची पण पक्षातून हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरी टीका केली आहे. ‘मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा’ अशा शब्दात अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘उद्धवजी.. आपण राजीनाम्याची घोषणा करून अजूनही राजीनामा न दिलेले विधान परिषदेचे आमदार आहात. त्यामुळे मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? या विधिमंडळात, आणि लोकांचा प्रश्नांना वाचा फोडा,’ असं भातकळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

दरम्यान सरकारमध्ये भाजपसोबत युती केलेल्या शिंदे गटात मंत्री झालेले उदय सामंत यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. आणि त्यांना पक्षातून बेदखल करण्यात आले आहे. तसे पत्रच शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत काढण्यात आले आहे.

शिवसेनेकडून महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सभा घेणाऱ्या आदित्य ठाकरेंना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय. सभांमध्ये सातत्याने आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर गंभीर आरोप करत त्यांना गद्दार म्हणत असतात.

भाजप त्यांच्यासोबत युती करणाऱ्या शिंदे गटाला कायम समर्थन देताना दिसते. त्यामुळे शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर भाजप नेत्यांकडून टीका होत असल्याचे दिसते. भाजप नेते अतुल भातखळकरांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. आता शिवसेनेकडून त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते. हे येत्या काळात पहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : एकमेकांविरोधात सोशल मीडियात पोस्ट टाकाल तर… राज ठाकरेंनी भरला मनसे पदाधिकाऱ्यांना दम
वाढदिवसाच्या पार्टीत भयानक दुर्घटना; मित्रांनी केलेली गंमत जीवावर बेतली
Beauty Tips: वाढत्या वयाची चिंता सोडा अन् वापरा ‘हे’ घरगुती उपाय, चाळीशीतही दिसाल एकदम तरुण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now