Share

नाना पटोलेंचा पाय खोलात; भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल, अटकेची केली मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपाने हल्लाबोल केला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोले म्हणाले असल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं.

त्यानंतर आता भाजपाकडून नाना पटोलेंच्या अटकेंची मागणी करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून भाजपाच्या नेत्यापर्यंत सर्वांनीच नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे.

तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पटोलेंनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसात जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी पोलीसांत जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, ”मविआ सरकारचे मंत्री आणि त्यांचे नेते नेहमीप्रमाणे या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. मात्र सरकारला त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, अन्यथा परिणाम तुमच्यासमोर असतील. मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी पोलीसांत जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.”

दरम्यान दुसरीकडे नाना पटोले यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहे. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरू आहे आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो.’

याचबरोबर वेळ आली तर मारू सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही, असं आश्वासन दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
”नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा!”
ओलाचं इलेक्ट्रीक स्कूटरच्या ग्राहकांसाठी खास गिफ्ट; दिली ‘ही’ भन्नाट आॅफर
“माझ्याविरोधात बोलल्यावर शांत झोप लागली का गं? स्वामी समर्थांना तु काय कारण सांगीतलंस”
पाटील विरूद्ध पटोले! माझ्या विरोधात जायचं तिकडं जा, आम्ही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार

 

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now