पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना वाढवला असा अरोप नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याच मुद्याला धरून महाविकास आघाडी मधील नेत्यांनी देखील भाजपवर पलटवार केला.
तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘योजना केंद्राच्या होत्या तुम्ही काय दिल? लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढलं, असे पाटील यांनी म्हंटले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची. लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता. आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचं अपयश आहे, असे पाटील म्हणाले.
‘मोदींच एवढंच म्हणणं आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. ‘नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ‘मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था आम्हीच केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही, असे मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ऍकेडमीमध्ये जाण्यासाठी नव्हते पैसै, वडिलांची दोन वेळा नोकरी गेली, तरीही जिंकून दाखवला वर्ल्ड कप
लतादीदींच्या वडिलांच्या पिंडाला शिवत नव्हता कावळा, तेव्हा लतादीदींनी ‘ही’ प्रतिज्ञा घेतली अन् कावळा शिवला
‘हिंदी कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हाला अडवलं तेही मराठी पोलिसांनी’, हेमांनी कवीने सांगितला घटनाक्रम
रात्री गाडी चालवताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर होऊ शकतो तुमचा अपघात