Share

BJP: भाजप नेत्याचे एकनाथ शिंदेंच्या पुत्राला आव्हान? म्हणाले, कल्याण लोकसभेत आता कमळ फुलणार

shrikant shinde eknath shinde

bjp leader challenge eknath shinde son shikant shinde | राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे. असे असले तरी काही भाजप नेते बंडखोर आमदारांवर आणि काही बंडखोर आमदार भाजप नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. आता भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी एक असे वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला भाजपसोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या लोकसभा निवडणूकीत भाजप कल्याण मतदार संघात नागरिकांच्या आवडीचा आणि विरोधी पक्षाच्या देखील मनातला उमेदवार दिला जाईल, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कळवा येथे झालेल्या एका बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते.

कल्याण लोकसभा मतदार संघात कमळ जिंकवायचे आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद खुप मोठी आहे. या मतदार संघातील कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला भाजपसोबत युती केल्याशिवाय पर्याय नाही, असे देखील यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघातून दोनदा निवडून आलेले आहेत. ते तेव्हा भाजपसोबत युतीमध्ये होते. २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणूकीत ते निवडून आल्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा हा बालेकिल्ला समजला जातो.

या लोकसभा मतदार संघात भाजपचा मतदार जास्त आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या जास्त आहे. अशात कल्याण लोकसभा मतदार संघात कमळ निवडून आणण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shahrukh khan: ज्या मराठी अभिनेत्याला शाहरुखच्या वॉचमननं दारातही उभं केलं नव्हतं, आता तोच करतोय किंग खानसोबत काम
फक्त ९ रुपयात विमान प्रवास; ‘या’ कंपनीने केली धमाकेदार ऑफर जाहीर, बुकिंग सुरू
BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now