Share

मुंबईत एके ४७ ने गॅंगवार, तिहार जेलची हवा, दाऊदशी संबंध…; ब्रिजभुषणची खतरनाक कुंडली

brijbhushan

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सध्या अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण असे की, राज यांच्या दौऱ्याला होणारा वाढता विरोध. येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालं.

राज ठाकरेंच्या विरोधात थेट भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दंड थोपटले आहेत. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. तर दुसरीकडे ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

यामुळे सध्या ब्रिजभूषण सिंह हे देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. ब्रिजभूषण सिंह हे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज ठाकरेंना एवढं कडवट आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह हे नेमके आहेत तरी कोण? असा सवाल सध्या उपस्थित होतं आहे. तर जाणून घेऊया ब्रिजभूषण सिंह यांची राजकीय पार्श्वभूमी..

ब्रिजभूषण सिंह यांची राजकीय पार्श्वभूमी वाचून तुम्हीही आवक व्हाल. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बृजभूषण सिंह यांचा राजकीय इतिहास हा मुंबईतील गँगवॉरपासून ते तिहार जेलची हवा आणि त्यानंतर थेट खासदारकीची खुर्ची असा थक्क करणारा आहे. सध्या ते उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहे.

एवढच नाही तर थेट दाऊद गँगशी देखील ब्रिजभूषण सिंह यांच नाव जोडलं गेलं आहे. मुंबईतल्या पहिल्या AK 47 चा वापर करून जे गँगवॉर झालं. ती दाऊदच्या लोकांकडून करण्यात आली होती. फायरिंग केल्यानंतर ते लोक उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे सांगितले जाते आहे.

त्यानंतर फायरिंग करून उत्तर प्रदेशात गेलेल्या लोकांना लवपल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. याचबरोबर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एकदा टाडाही लागला होता. त्यासाठी त्यांना थेट तिहार जेलची हवा देखील खावी लागली होती. तर आता राज ठाकरेंना आव्हान दिल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘धर्मवीर’ चित्रपटाने रचला महाविक्रम; एकाच दिवसात ४०० स्क्रिनवर १० हजारांहून अधिक शोज
आजची सभा आतापर्यंत झालेल्या १०० सभांचा बाप आहे; शिवसेनेच्या ढाण्या वाघाने फोडली डरकाळी
“हरामखोर, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे, लवकरच तुला चोप मिळणार”
केतकी चितळेचा पाय खोलात! पवारांविषयी केलेली ‘ती’ पोस्ट पडणार महागात; पोलिस स्टेशनमध्ये…

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now