BJP : काल मुंबईत शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक मुद्द्यांवरून शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत जेव्हा संकटे येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरत असतो, तेव्हा भाजपवाले कुठे असतात?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. त्यांच्या या प्रश्नावर आता भाजपकडून चोख उत्तर देण्यात आले आहे.
https://twitter.com/ShelarAshish/status/1572611976706273283?t=611L8G_GRzYriExizpsYIw&s=19
भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. “२६ जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी धावत होते, हे खरे आहे. पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे २६ जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वतः पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते, त्याचे काय?” असा सवाल आशिष शेलार यांनी या ट्विटमध्ये केला आहे.
२६/११ च्या हल्ल्यात जातपात, पक्ष न बघता मुंबईकर मुंबईकरांसाठी मदत करत होते. आमचा कमलाकर दळवीसुद्धा नरिमन हाऊस, ताज या परिसरात मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच बँड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचवताना ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तो रमेश वाळुंज हादेखील भाजपचा कार्यकर्ता होता.
जेव्हा त्याचे धाडस चर्चेत आले तेव्हा हा कार्यकर्ता आमचा आहे असे सांगत हे घरी पोहोचले, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, कोरोनाकाळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते. त्यावेळी तुम्ही घरी बसले होते, असेही शेलार म्हणाले.
https://twitter.com/ShelarAshish/status/1572611991201628162?t=VC5Gj1saZw6-J0nLKkACMw&s=19
तसेच स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य व गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो कार्यकर्ते हे भाजपचे होते, हे तुम्हाला कसे दिसणार?, असेही शेलार म्हणाले. आशिष शेलार यांनी आणखी एक ट्विट करत भाजप मुंबई जिंकणार असल्याचा इशाराही दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, “मुंबई जिंकायला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय?”
https://twitter.com/ShelarAshish/status/1572611993860808705?t=s340XSkrbS7zb0fi6TuvDA&s=19
“अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे… भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे!,” असे ते म्हणाले. तसेच “मुंबईकरांना बदल हवाय… मुंबईकरांचं ठरलंय! म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!!,” असेही आशिष शेलार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; ऐतिहासिक दुर्गाडी गडावरील देवीच्या उत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
dussehra melava : अखेर ठरलं! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला? पालिकेने एका वाक्यात केला विषय ‘क्लोज’
Gajanan Kirtikar : पुन्हा भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती करणार; शिवसेनेतील बड्या नेत्याचे वक्तव्य
Shinde Group : …तर आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू पण ‘या’ अटीवर; शिंदे गटाची ठाकरेंना जाहीर ऑफर