Share

हिंदूंबाबत गरळ ओकणारा उस्मानी अजूनही मोकाटच; कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे?

राज्यातील हिंदुत्व, हनुमान चालिसा, नवनीत राणा, राज ठाकरे, भोंगे, भाजपकडून वारंवार होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. १४ तारखेला पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधकांना सुनावलं आहे. जमलेल्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली होती. (bjp leader angry on uddhav thackeray)

यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसह राज ठाकरेंनादेखील सुनावले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर अनेक नेत्यांची त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. भाजपनेही मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधला होता. त्यामुळे तुषार भोसले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोणत्या तोंडाने तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

काश्मिरी पंडित राहूल भट यांची हत्या केलेल्या आतंकवाद्यांना मोदी सरकारने २४ तासांच्या आत संपवलं, कारण ते हिंदुत्वाचे रक्षक आहेत. पण इथे पालघरमध्ये साधूंची ठेचून हत्या झाली. त्यांच्या हत्येला २४ महिने उलटून गेले पण अजूनही कोणाला दंड करण्यात आलेला नाही, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

हिंदु समाजाविषयी गरळ ओकणारा सर्जिल उस्मानी माणूस अजूनही मोकाट आहे. त्याच्यावरही कोणतीच कारवाई झालेली नाही आणि कोणत्या तोंडाने तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असे देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना हा इशारा दिला असल्याचेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
केतकीच्या बाजूने चित्रा वाघ मैदानात; शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्यांवर कारवाईची मागणी
‘आता ठेचायची वेळ आलीये, केतकी सारख्या विकृत लोकांनी..,’ किरण माने यांनी स्पष्टच सांगितलं..
..तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तुरूंगात जाणार; नवनीत राणांच्या विधानाने राज्यात खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now