Share

भाजप हा काही १९८० मध्ये स्थापण झालेला पक्ष नाही, भाजपला ५ हजार वर्षांचा इतिहास – चंद्रकांत पाटील

शांतनू गुप्ता लिखित आणि मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘काल आज आणि उद्या’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी पुण्यात झालं. हे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप पक्षाच्या स्थापनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप हा काही 1951 साली स्थापन झालेला पक्ष नाही, त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे, यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा संदर्भ दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

म्हणाले, हिंदुत्वाच्या विचारधारेवर वाटचाल करणारा भाजप हा केवळ 1980 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय पक्ष नसून याला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे आमच्यामुळे भाजप ग्रामीण भागात दारोदारी पोहोचला अशा गमजा किंवा फुशारक्या मारणा-यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. हिंदू विचार हा केवळ कर्मकांडांशी जोडलेला नसून संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेला आहे.

भाजपाबद्दल किती अज्ञान असावं, या पक्षाला पाच हजार वर्षांच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हा विषय अज्ञानाचा असू शकतो. पण हा पक्ष 80 साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते. अशा लोकांना पक्ष 80 साली स्थापन झाला. त्यानंतर त्याला आम्ही गावोगावी नेलं असं काहींना वाटतं. असं म्हणत संजय राऊतांना टोला लगावला.

भाजप पक्षाला मोठा वसा आहे, या पक्षाला हात लावता येणार नाही हे माहिती आहे. अशावेळी हा ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्त्वाचं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे. आम्ही केवळ 1951 साली स्थापन झालेलो नाही, आम्ही केवळ 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झालेलो नाही, आमची परंपरा पाच हजार वर्षांची आहे, असे पाटील म्हणाले.

दरम्यान फडणवीस म्हणाले, भाजपचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील दिशा आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची मदत होईल. हिंदूत्त्व हा शाश्वत विचार नष्ट कसा होईल, यासाठीच भारतावर परकीयांचे हल्ले झाले, आणि आपल्या आत्मविश्वासाचे असलेली प्रतिके म्हणजे अयोध्येतील राम मंदिर, कृष्णजन्मभूमी, काशीविश्वेश्वर मंदिर आणि सोमनाथ मंदिर ही केंद्रे लक्ष्य केली गेली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now