BJP : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सगळीकडूनच सरकारवर टीका होत होती.
मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातील ही चूक आता दुरुस्त करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन महिला आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ आणि नाशिकच्या देवयानी फरांदे यांची नावे समोर आली आहेत.
यांच्यापैकी एकीला कॅबिनेट मंत्रिपद तर एकीला राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यांच्यासोबतच आणखी दोन आमदारांची नावेदेखील चर्चेत आहेत. यामध्ये मनीषा चौधरी आणि सीमा हिरे यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे ९ व शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अनेकांनी नाराजी दर्शवली होती. ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही ते नाराज असल्याचे बोलले जात होते.
यासोबतच एकही महिला उमेदवाराला स्थान मिळाले नसल्याने भाजपमधील काही महिला आमदारही नाराज असल्याचे बोलले जात होते. यावरून नव्या सरकारवर प्रचंड टीकादेखील होत होत्या. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता आता दोन महिला आमदारांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
या दोन महिला आमदारांपैकी कॅबिनेट मंत्रिपद कुणाला व राज्य मंत्रिपद कुणाला याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच नवीन मंत्रिमंडळ विस्तारात आणखी कोणकोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Kapil Sharma: ..त्यामुळे ‘कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनमधून ‘या’ कॉमेडियनचा पत्ता झाला कट, चाहत्यांना धक्का
Zarkhand : पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या अभिनेत्रीचा पर्दाफाश, ‘असा’ रचला होता प्लॅन
Sonali Phogat: मृत्युच्या काही तासांपुर्वीच सोनाली फोगाटने शेअर केला होता ‘हा’ व्हिडीओ, तिला यातून काय दाखवायचे होते?
Sonam Kapoor baby PHOTO: सोनम कपूरच्या गोंडस बाळाचा फोटो आला समोर, चाहत्यांनी पाडला शुभेच्छांचा वर्षाव