BJP : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्याकडे होता. मात्र, त्यांच्या मृत्युमुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना संधी देण्यात येणार होती. तसेच शिंदे गटासाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने या विधानसभा निवडणुकीत ते आपल्या उमेदवाराला उभे करणार होते.
मात्र, आता शिंदे गटाला मागे सारत भाजपने याठिकाणी आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी शिंदे गटाऐवजी आता भाजपचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळणार आहे. मुरजी पटेल भाजपचे हे माजी नगरसेवक आहेत. तर शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाकडे निवडणूक चिन्ह असणे आवश्यक होते. मात्र, शिवसेनेचे दोन गट झाल्याने धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे याबाबतचा वाद कोर्टात सुरु आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी लवकर व्हावी, अशी मागणीही शिंदे गटाकडून करण्यात आली होती. ती मागणी ही पोटनिवडणूक लढवण्यासाठीच केली असल्याचेही बोलले जात आहे.
ही सगळी तयारी सुरु असताना आता भाजपने शिंदे गटाच्या जागेवर आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट ही निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच आता अंधेरी पूर्व विधानसभा शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कोणाच्या पदरात पडते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
Vedant project : वेदांतामुळे १ लाखाचा लॅपटॉप मिळणार ४० हजाराला; चेअरमन अग्रवाल नेमकं काय म्हणाले? वाचा…
Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार
Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा खोटेपणा झाला उघड, वेदांता प्रकल्पाबाबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला लीक
Vedanta project : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवालांनी केला खुलासा