Share

भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर? राजकीय घडामोडींना आला वेग

विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे २५ आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आहे.

असच असतानाच एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून येत आहे. भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. यावर अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आज दुपारी शिंदे हे सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. यामुळे शिंदे यांच्या राजकीय भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानपरिषद निवडणुकीत ज्या ११ मतांना भाजपने सुरुंग लावला होता, सुरुवातीला जे ११ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, ते हेच असल्याची माहिती आहे. यामागे भाजपचीच खेळी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
विधान परिषदेचे मतदान सुरु असतानाच एकनाथ शिंदेनी केलं प्लॅनिंग, धक्कादायक माहिती समोर

मुख्यमंत्री आमदारांसोबत बोलत असतानाच एकनाथ शिंदेनी गेम केला, महत्वाची माहिती समोर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now