राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप(BJP) उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.(bjp dhanjay mahdik win in rajysabha election know about him)
आता विजयाचा दुष्काळ संपला आहे, अशी भावना भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१.५६ मतं मिळाली आहेत. “भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यामागे शिल्पकार जर कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्यामुळे विजय मिळाला आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजयानंतर दिली आहे.
धनंजय महाडिक मूळचे कोल्हापूरचे आहेत. धनंजय महाडिक यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील राजर्षी शाहू कॉलेजमधून झाले. धनंजय महाडिक यांनी बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयात असताना विद्यापीठातील अनेक निवडणुकांमध्ये धनंजय महाडिक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
धनंजय महाडिक यांचे वडील उद्योगपती होते. वडिलांच्या निधनानंतर धनंजय महाडिक यांनी उद्योग सांभाळण्यास सुरवात केली. १५ वर्षांपासून धनंजय महाडिक सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. धनंजय महाडिक यांनी २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आहे. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदाशिवराव मंडलिक या निवडणुकीत विजयी झाले होते. २००९ साली धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण २००९ साली धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली.
धनंजय महाडिक यांच्या जागी छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच वर्षी धनंजय महाडिक यांनी विधानसभेची देखील निवडणूक लढवली होती. २०१४ साली धनंजय महाडिक यांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं होतं. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला.
पण २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा विजय झाला होता. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कोल्हापूरमध्ये भाजपचे वर्चस्व वाढवण्यासाठी यंदा राज्यसभेला धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :-
उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य
प्रसिद्ध गायिकेच्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीने घातला गोंधळ, पोलिसांना बोलावून करावी लागली अटक
क्रीडामंत्र्यांनी रणजी ट्रॉफीत घातला धुमाकूळ, वयाच्या ३६ व्या वर्षी ठोकले शतक, रचला इतिहास