२०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. २०१४ पासून देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. पहिल्यांदाच २०१९ च्या निवडणुकीत भाजपा बहुमतानं पुन्हा केंद्राच्या सत्तेत विराजमान झाली.आता मोदी सरकार २०२४ साठी पुन्हा एक मास्टर प्लॅन करण्याच्या तयारीत आहे.
लोकसभा निवडणुकीला अजुन दोन वर्षांपेक्षा ही जास्त कालावधी शिल्लक असतानादेखील भाजपने २०२४ च्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आता मोदी सरकार २०२४ साठी पुन्हा एक मास्टर प्लॅन बनवत आहे.
मोदी सरकारचा काय आहे मास्टर प्लॅन
मास्टर प्लॅन म्हणुन भाजपने बूथ स्तरापर्यंत तयारी सुरू केली आहे. २०१४ व २०१९ च्या मतदान पद्धतीच्या आधारे, भाजपने देशभरात ७३००० कमकुवत बूथ निवडले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या सर्व बूथवर चांगल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या सर्व ठिकाणी पक्षाचे वर्चस्व मजबूत करण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा व पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने यासाठी ४ सदस्यांची एक समिती तयार केली आहे.या समितीचे संपुर्ण नेतृत्व भाजपमधील विजयंत जे पांडा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
समिती मध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे
पांडा यांच्यासोबत या समितीमध्ये कर्नाटकचे आमदार आणि भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि पश्चिम बंगालचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीप घोष यांचा समावेश आहे.
या समितीला देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कमकुवत बूथची संख्या आणि पक्षाच्या खराब कामगिरीचे कारण जाणून घेण्यास सांगितले होते. सध्या या समितीने देशभरात ७३००० बूथ निवडले आहेत, जिथे भाजपची स्थिती खूपच कमकुवत आहे. त्यातील बहुतांश दक्षिण भारतातील राज्ये आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात पक्ष मुख्य पक्षाच्या रूपात असून तेथील काही बूथ वगळता पक्षाची स्थिती चांगली आहे. या पथकाने मसुदा तयार केला आहे. तो लवकरच अंतिम करून पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर या बूथवर पक्षाचे काम सुरू होईल. मसुद्याच्या अहवालानुसार, तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व अद्याप अस्तित्वात नव्हते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत, थोड्या मेहनतीने पक्ष बूथ स्तरावर मजबूत होऊ शकतो. असे झाले तर तेलंगणा सरकारला ते मात देऊ शकतात.
त्याचबरोबर केरळच्या जनतेचा कौल भाजपच्या बाजूने नाही. गेल्या वर्षभरात भाजपच्या २५ कार्यकर्त्यांची राजकीय हत्या करण्यात आल्याचे मसुदा अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवी समिती भाजपच्या संघटना आणि देशातील सर्व ७३००० कमकुवत बूथचा अहवाल तयार करत आहे. पक्ष कसा मजबूत करता येईल?याबाबत सूचना केल्या जातील. अहवालात अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मतही मांडण्यात येणार आहे. हा मसुदा पक्षश्रेष्ठीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर रणनीतीनुसार नियोजन करून पक्षसंघटनेसाठी पक्षनेते काम करतील.
महत्वाच्या बातम्या
सभेपुर्वीच मनसेला धक्का! औरंगाबादमधील फायरब्रॅंड नेत्याचा मनसे सोडून भाजपात प्रवेश
VIDEO: ट्रक ड्रायव्हरनं मोहम्मद रफींचं गाणं असं गायलं की, लोकं म्हणाले, याला म्हणतात टॅलेंट!
ब्रेकिंग! खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांच्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी, गाडी फोडली
राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली नाही, तरी…; भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे वक्तव्य