अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकले. यानंतर राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे.
याचाच धागा पकडत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही किरण माने यांच्यावर सडकून टिका केली आहे. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
तसेच सोबतच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी टिका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठिशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे,’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1482926029052452867?s=20
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ”किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला.
तसेच त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे परिपत्रकात म्हंटले आहे.
पुढे स्टार प्रवाहने पुढे म्हटले आहे की, ”आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या
विराटच्या राजीनाम्यानंतर रोहितने केलेल्या ‘या’ पोस्टने क्रिडाविश्वात उडाली खळबळ; म्हणाला…
मोठी बातमी: अखेर विराटनंतर होणाऱ्या कॅप्टनचे नाव ठरले! मात्र खेळाडूसमोर आहे ‘ही’ अट
पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेणाऱ्या विकीला एकेकाळी सराव करणेही झाले होते अवघड
मोठी बातमी: अखेर विराटनंतर होणाऱ्या कॅप्टनचे नाव ठरले! मात्र खेळाडूसमोर आहे ‘ही’ अट