Share

शिवसेनेत इनकमिंग! पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप, राष्ट्रवादीला गळती; राजकीय समीकरण बदलणार?

shivsena join

आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होऊ लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच पुण्यात राष्ट्रवादी, भाजपाला जबर धक्का बसला आहे. आज तब्बल सहा नेत्यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. या पक्षांतराने पुण्यात आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची समीकरण बदलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (bjp and ncp leaders join shiv sena in pune)

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात या नेत्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भाजपचे अमोल शिंदे, सुखदेव मांडेकर, गणेश मांडेकर, इ यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसेल. महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.

तसेच काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेविका व गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे पुण्यात मनसेला देखील जबर धक्का बसला आहे. आता महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना जयश्री मारणे यांनी पक्षप्रवेश केल्याने हा पक्षप्रवेश सध्या चर्चेचं कारण ठरला आहे.

जयश्री मारणे याआधी कोथरूड मध्ये मनसेच्या नगरसेविका होत्या. गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. जयश्री मारणे या पुण्यातील गुंड गजानन मारणेच्या पत्नी असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी असा दावा केला होता की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीतील तब्बल १५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

येत्या १४ मार्चला पुणे महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. जगताप यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गाढवावर मुख्यमंत्र्याचा फोटो लावणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धक्कादायक कारण आले समोर
नवऱ्यानं सोडलं, सासऱ्यासोबतच हलाला, नंतर लागली रांगच रांग; पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल
पोतंभर नाणी घेऊन स्कुटर घेण्यासाठी पोहोचला, सुट्टे पैसे मोजून कर्मचाऱ्यांना फुटला घाम, वाचा पुढं काय घडलं..
याला म्हणतात प्रेमानं चोरी! दवाखान्याजवळ भेटायचा, चहा पाजायचा अन्.., वाचून अवाक व्हाल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now