नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते अद्वय हिरे हे भाजपमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिंदे गट आल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये स्थान उरलेले नाही. सन्मानाची वागणूक दिली जात नाहीये. मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहीलं. पण भाजपने त्यांची भूमिका समजून घेतली नाही, असे अद्वय हिरे यांनी म्हटले आहे.
मालेगावमध्ये होणाऱ्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण भाजप त्यांची बाजू समजून घेत नाहीये. उद्धव ठाकरे यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका माझ्यासह कार्यकर्त्यांनी घेतली आहे, असे अद्वय हिरे यांनी म्हटले आहे.
अशात अद्वय हिरे यांच्या जुन्या पोस्ट सुद्धा व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल करताना दिसून येत आहे. हिरेंनी भाजप सोडल्यानंतर त्या पोस्ट व्हायरल झाल्या आहे. त्यावरही अद्वय हिरे यांनी वक्तव्य केलं आहे.
माझ्यावर टीका होतेय साहेब की मी पक्षांतर करतो. पण माझा नाईलाज आहे साहेब. ज्या माणसाला राजकारणात विरोध आहे. तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतंय. ते पक्ष बदलतात त्यामुळे मी पक्ष बदलतो. त्यांना तुम्ही स्थिर राहायला सांगा मी कधीच शिवसेना सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी दादा भुसेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
तसेच कितीही खोके दिले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही, पैशांसाठी व सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद आपली नाही, अशा शब्दात आपण भाजपला खडसवल्याचेही अद्वय हिरे यांनी पक्षप्रवेशावेळी बोलताना म्हटले आहे.
मागच्या काळातील जी भाषणं आहे. त्याबद्दल मला बोलायचं आहे. भाजपमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. तिथे बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. आम्ही सभा घेतो तेव्हा काय बोलायचं काय नाही हे सर्व सांगितलं जातं. ते सगळं स्क्रिप्टेट असतं. सोशल मीडियावर काय टाकायचं हे सुद्धा तेच सांगतात, असेही अद्वय हिरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
हार्दीक पांड्याच्या ‘या’ घोडचूकांमुळे भारताने गमावला पहीला ट्वेंटी सामना; न्युझीलंडची १-० ने आघाडी
पहा जेनेलीया डिसूझा आणि रितेश देशमुखच्या लग्नाचे कधीही न पाहीलेले सुंदर फोटो
७० वर्षीय सासऱ्याला स्वत:च्या २८ वर्षीय सुनेवर झाले प्रेम; मंदीरात जाऊन एकमेकांसोबत केले लग्न