Share

वाढदिवस विशेष: ऑटोग्राफ मागणाऱ्या फॅनच्याच प्रेमात पडले होते गावस्कर , नंतर पत्ता शोधून काढला अन्..

क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत ज्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यातीलच एक मोठे नाव सुनील गावस्कर. या दिग्गज फलंदाज आणि कर्णधाराने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. जगात भारतीय क्रिकेटला नाव मिळवून देण्यात या क्रिकेटरचे योगदान आहे. आज लिटिल मास्टर त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांची हटके प्रेम कहानी.. (Birthday Special: Gavaskar fell in love with a fan)

जसे क्रिकेटचे मैदान लिटिल मास्टरने गाजवले, तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांची प्रेम कहानी एखाद्या उत्कंठावर्धक फिल्मी स्टाईल सामन्यापेक्षा कमी नाही. सुनील गावस्कर हे कोणत्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले नाही, तर त्यांच्याच एका फिमेल फॅनने त्यांची विकेट पाडली.

‘मार्शलिन’ असे त्या फॅनचे नाव आहे. मार्शलिन एक दिवशी क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या होत्या. सामना संपल्यानंतर त्या सुनील गावस्करांकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी गेल्या, तेव्हा गावस्करच पहिल्या नजरेत त्यांच्या प्रेमात पडले.

मार्शलिन यांची माहिती काढण्यास त्यानंतर सुनील गावस्करांनी सुरुवात केली. त्यांना समजले की, मार्शलिन मूळच्या उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या आहेत. तेव्हा गावस्कर कानपूरमधील त्यांच्या मित्राकडे गेले. त्यादरम्यान मार्शलिन यांच्या घराचा पत्ता त्यांनी शोधून काढला. ते सिनेमातील हिरोप्रमाणे मार्शलिनच्या घराजवळ ये जा करत राहिले.

मार्शलिन दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये शिकत होत्या. मार्शलिन यांना माहीत सुध्दा नव्हते की, कोणीतरी त्यांच्या प्रेमात एवढे वेडे झाले आहे की, त्या व्यक्तीने दिल्लीहून थेट कानपूर गाठले. गावस्करांचे मार्शलिनवर प्रेम जडले होते. मार्शलिन त्यांना आयुष्यभरासाठी सोबत पाहिजे होत्या.

पुढे गावस्करांनी मार्शलिन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कानपूर क्रिकेट स्टेडियममध्ये होणारा सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले. सामना संपल्यानंतर मार्शलिन आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव कुटुंबीयांसमोर ठेवला. मार्शलिनच्या घरच्यांनी सुद्धा आनंदाने तो प्रस्ताव स्वीकारला. शेवटी मार्शलिनच्या प्रेमात अखंड बुडालेल्या गावस्करांची प्रेम कहानी लग्नापर्यंत पोहोचली.

महत्वाच्या बातम्या-
उपासमारीने ‘या’ देशाची झाली वाईट अवस्था, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर हल्ला, राष्ट्रपती झाले फरार
रणबीर कपूरला दहावीत मिळाले होते फक्त एवढे गुण, म्हणाला, पास झालेलो मी कुटुंबातील पहिला व्यक्ती
शिंदे गटाला समर्थन देणं तानाजी सावंतांना भोवलं, उद्धव ठाकरेंनी केली मोठी कारवाई

 

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now