Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने बेबी शॉवर केल होत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल झाले होते. प्रेग्नेंसी एन्जॉय करत असताना अचानक बिपाशाचे नवजात बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. Bipasha Basu, Social Media, Karan Singh Grover, Vivan Bhatena,PHOTO
या फोटोंमध्ये अभिनेत्री पती करण सिंग ग्रोव्हरसोबत नवजात बाळाला कुशीत घेताना दिसत आहे. फोटो पाहून सोशल मीडिया (Social Media) यूजर्स या जोडप्याचे मनमोकळेपणाने अभिनंदन करत आहेत. कदाचित बिपाशाने मुलाला जन्म दिला असावा, असे चाहत्यांना वाटते. या कपलच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या मांडीत नवजात बाळ घेऊन खूपच गोंडस दिसत आहेत. बाळावर प्रेमाचा वर्षाव करताना हे जोडपे नवीन पालकांसारखे दिसते. हे बाळ बिपाशाच नसून तिने अद्याप मुलाला जन्म दिलेला नाही. बिपाशाच्या मांडीवर असलेल हे बाळ अभिनेता विवान भटेनाच (Vivan Bhatena) आहे.
बिपाशा आणि करण टीव्ही अभिनेता विवानच्या मुलीला भेटण्यासाठी अचानक त्यांच्या घरी भेटायला गेले होते. हा फोटो 2019 मधील आहे जो 2019 मध्ये करण सिंग ग्रोव्हरने पोस्ट केला होता. मात्र, आता बिपाशाच्या प्रेग्नेंसीनंतरचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून, कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी या जोडप्याला आई-वडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
टीव्ही अभिनेता विवान भटेना आणि करण सिंग ग्रोव्हर हे अनेक दिवसांपासून चांगले मित्र आहेत. लग्नाच्या 14 वर्षानंतर विवान आणि त्याची पत्नी आई-वडील झाले. त्यामुळे बिपाशा आणि करणने घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले. बिपाशा आणि करण दोघेही विवानच्या मुलीला भेटण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होते. करणने 2019 मध्ये सोशल मीडियावर मुलीसोबतचे हे अतिशय गोंडस फोटो शेअर केले होते, फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले, “आज या सुंदर छोट्या देवदूताला भेटून खूप आनंद झाला, नाव आहे निवाया.”
बिपाशाच्या गरोदरपणात, चाहत्यांनी या जोडप्याच्या जुन्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली. यूजर्सनी स्टार कपलचे अभिनंदन करायला सुरुवात केली. बहुतेक युजर्स कमेंट बॉक्समध्ये बिपाशाचे आई झाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसत आहेत, तर काहीजण तिच्या मुलीला सुपर क्यूट म्हणत तिचे कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Sonam Kapoor child : पेढा की बर्फी? सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म, नीतू कपूरने आनंद आहुजाचे केले अभिनंदन
बाॅलीवूडची आवड असणाऱ्या सायमंडसने बिपाशा बासूसोबत दिला होता दमदार परफाॅर्मन्स; जाणून घ्या…
PHOTO: बिपाशा बसू वयाच्या ४३ व्या वर्षी झाली प्रेग्नेंट, शर्ट पॅन्ट घालून बेबी बम्पचा फोटो केला शेअर