Share

फक्त १९ हजारात खरेदी केलेल्या जुन्या कपाटात सापडले कोट्यावधींचे घबाड; क्षणात झाला करोडपती

जुन्या पेटीतून, किंवा अलमारी मधून कधी कधी खूप मौल्यवान वस्तू मिळतात. आपल्या आजी आजोबांनी, किंवा जुन्या लोकांनी ठेवलेल्या अनेक वस्तू मिळाल्यानंतर त्याचा आनंद वेगळाच असतो. असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने ऑनलाइन साईटवरून एक सेकेंड हॅन्ड अलमारी खरेदी केली होती, ती उघडली तेव्हा आतील दृष्य पाहून तो अवाक झाला.

ही घटना जर्मनी मधील आहे. जर्मनीत एका व्यक्तीने eBay या ऑनलाइन साइटवररून एक सेकंड हँड अलमारी खरेदी केली. त्या व्यक्तीचे नाव थॉमस हेलर आहे. जेव्हा ती अलमारी त्याच्या घरी आली, तेव्हा त्याने ती उघडून पाहिली. अलमारीमध्ये असे काही होते, जे पाहून त्या व्यक्तीला धक्का बसला.

माहितीनुसार, थॉमस हेलर हा मूळचा बिटरफील्ड, जर्मनीचा आहे. त्यानं त्याच्या घरामधील किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी सेकंड हँड कपाट खरेदी केले होते. हे कपाट त्याने eBay या साईटवरून मागितले होते. त्याने 19 हजार रुपयांमध्ये हे कपाट खरेदी केले होते.

जेव्हा त्याने ते कपाट उघडून पाहिले तेव्हा त्याला त्यात दोन बॉक्स मिळाले. त्या बॉक्समध्ये 1 कोटी 19 लाख रुपयांची रोकड होती. ही रोकड पाहून त्याला धक्का बसला. मात्र, थॉमसने ही रोकड स्वतः कडे ठेवली नाही. त्यानं ही रोकड संबंधित अलमारीच्या मालकापर्यंत पोहोचावी यासाठी पोलिसांशी संपर्क साधला.

ती रोकड पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधित अलमारी कोणाची याचा तपास लावला. तेव्हा समजले की हे पैसे हँले सिटीमध्ये राहणाऱ्या 91 वर्षीय वृद्ध महिलेचे आहेत. या अलमारीची पहिली मालकीनही तीच होती. या वृद्ध महिलेच्या नातवाने तिच्या परस्पर अलमारी विकली होती.

तिच्या नातवाला त्यात पैसे असल्याची माहिती नव्हती. मात्र, आता पोलिसांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेचे पैसे तिला परत मिळाले. जर्मनीमध्ये हरवलेले पैसे आपल्याजवळ ठेवणे गुन्हा आहे. दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्यांना बक्षीसही दिले जाते. या घटनेत थॉमसनला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल साडेतीन लाखांहून अधिक रुपये मिळाले आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now