लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ चित्रपट आज ३ जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र याआधीच चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्याची माहिती मिळत आहे. अँडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राईट्समधून या चित्रपटाने एवढी कमाई केली आहे. या चित्रपटात कमल हसन हे प्रमुख भूमिकेत आहे. त्यांनी घेतलेली फीज ऐकून तुमचे डोळे फिरतील.
कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल यांच्या सारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला विक्रम चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ या चित्रपटात तमिळ सुपरस्टार कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल हे मुख्य भूमिकेत आहेत.
माहितीनुसार, या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी ५० कोटी एवढे मानधन घेतले आहे. तर, अभिनेता विजय सेतुपतीनं या चित्रपटासाठी दहा कोटींचे मानधन घेतलं आहे. लोकेश कनगराज यांनी या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये एवढे मानधन घेतले आहे. तर अभिनेता फसद आणि अनिरुद्ध यांनी प्रत्येकी चार कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
संगीतकार अनिरुद्ध रविकंदर यांनी ‘विक्रम’ साठी संगीत दिले असून, त्यांनी या चित्रपटातील दमदार गाण्यांनी चाहत्यांना अचंबित केले आहे. चाहत्यांना या डायनॅमिक संगीतकाराकडून सुंदर पार्श्वसंगीताची अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली आहे. ‘विक्रम’ या आठवड्यात अनेक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओपनिंग करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.
चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाव्यक्तिरिक्त दोन मोठे चित्रपटही थिएटरमध्ये आज दाखल झाले. पहिला म्हणजे अक्षय कुमारचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’, ज्यामध्ये मानुषी छिल्लर हिंदी चित्रपटांत पदार्पण करताना दिसले आणि दुसरा चित्रपट म्हणजे आदिवी शेष यांचा ‘मेजर’. हा चित्रपट २६/११ च्या हल्ल्यावर आधारित आहे.
या चित्रपटात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. आज या तीन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने अधिक कमाई केली याची आकडेवारी लवकरच समोर येईल. तिन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद आज दिसला.