Share

बिकिनी, किस आणि मग व्हिडीओ… मुंबईच्या मॉडेलने अनेक तरुणांना घातला गंडा, लाखो रुपये उकळले

एका मॉडेलने लोकांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लुबाडल्याची घटना समोर आली आहे. लोकांना अडकवण्याची तिची पद्धत बघून पोलीस देखील हैराण झाले आहेत. ती सोशल मीडियावर ब्लॅकमेलिंगसाठी तरुणांना शोधत होती. आधी ती श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती.

अशा प्रकारे तीने अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले होते. एका इंजिनिअर तरुणाच्या तक्रारीनंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत तिघेजण तरुणांना अडकवण्याचा प्लॅन आखत होते. ही टोळी तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होते.

दरम्यान, बंगळुरूमधील पुत्तेनहल्ली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार आली होती. नंतर पोलिसांनी तपास करत या मॉडेलच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुलांना ती मोबाईल नंबर देत असत तसेच त्यांच्यासोबत अश्लिल चॅटिंग करायची.

नेहा असे या मॉडेलचे नाव आहे. ती या टोळीची मुख्य सुत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.  तिने अनेक मुलांना घरी देखील बोलावले होते. ही तरुणी टेलिग्रामच्या माध्यमातून तरुणांच्या संपर्कात यायची.

त्यानंतर ती जेपी नगर फेज 5 या तिच्या राहत्या घरी तरुणांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवून तरुणांना बोलवायची नंतर ती मुलांना धमकावून पैसे काढत होती. दीड वर्षांपासून ही टोळी सुरू होती, असा पोलिसांचा दावा आहे. या टोळीने आतापर्यंत 50 हून अधिक जणांना लुटले आहे.

यामध्ये 35 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन आरोपींना अटक केली आहे. ही टोळी श्रीमंत मुलांना लक्ष करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्राईम

Join WhatsApp

Join Now