सध्या कलर्स टीव्हीवर सुरू असलेला बिग बॉस १५ हा रिऍलीटी शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र त्याअगोदर या शोच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना एक मोठा धक्का दिला आहे. १७ जानेवारीच्या भागात बिग बॉसच्या घरात राजीव अडातियाची (Rajiv Adatia) एंट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात राजीवची एंट्री पाहून काही सदस्यांना आनंद झाला आहे तर काहींना आश्चर्यही वाटले आहे.(bigg-boss-fem-tejaswis-this-role-wins-fans-heart)
शोमध्ये राजीवच्या अचानक एंट्रीने बिग बॉसचा हा खेळ पुन्हा एकदा उलथापालथ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राजीवने घरामध्ये रिंग मास्टरच्या भूमिकेत प्रवेश केला आहे, जो घरातील सदस्यांना त्याच्या इशाऱ्यावर नाचवताना दिसणार आहे. दरम्यान, राजीवने तेजस्वी प्रकाशशी (Tejaswi Prakash) केलेल्या संवादाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
खरंतर, हे आपल्या सर्वांचं माहिती आहे की, तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) शोच्या सुरुवातीपासूनच एकमेकींसोबत पटत नाहीत. अनेकवेळा या दोघीही छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडताना दिसतात. अलीकडेच करण कुंद्रावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला होता. अनेकवेळा तेजस्वी देखील करणबद्दल असुरक्षित दिसली होती.
आता, नुकतीच जेव्हा राजीवने घरात एंट्री घेतली. तेव्हा त्याने तेजस्वीशी शमितासोबतच्या त्यांच्या वादाबद्दल बोलताना दिसून आला. जेव्हा राजीव तेजस्वीला विचारतो की, ‘तिला शमितासोबत काही अडचण आहे का? त्यानंतर तो पुढे म्हणतो की, ‘त्यांच्यातील वाद नक्की कशामुळे आहे हे समजत नाही.’
त्यानंतर राजीव आणि तेजस्वी बोलत असताना दिसून आले. त्यांच्या दोघात शमिताचा विषय सुरू असतो. मात्र जेव्हा राजीव तेजस्वीला हा प्रश्न विचारतो, तेव्हा नंतर राजीव स्वतःच उत्तर देतो. राजीवचे उत्तर ऐकून तेजस्वी शांत बसते. यानंतर जेव्हा राजीवचे बोलणे संपते, तेव्हा शेवटी तेजस्वी म्हणते की, ‘तिचा आता शमितावर अजिबात विश्वास नाही.’
इतकंच नाही तर ती शमिताला खोटी आहे असं म्हणते. तेजस्वीचे असे मत आहे की, तिकिट टू फिनालेमध्ये कॅप्टन असताना राखीशी ज्या पद्धतीने शमिता वागली ते तिला आवडले नाही. त्याचबरोबर तेजस्वीचा हा बदललेला अवतार पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे तर, तेजस्वीच्या या अवताराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तेजस्वीचे चाहते ट्विट करून तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
तिला सल्ला ही देत आहेत की, यापुढेही हाच दृष्टिकोन कायम ठेव असे सांगत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीच्या वागण्यावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. काही चाहत्यांच्या मतानुसार, ‘तेजस्वीची वागणूक पूर्वी अजिबात चांगली नव्हती किंवा तिला कोणाचा मुद्दाही समजत नव्हता.’ मात्र आता हे पाहणे महत्वाचे असेल की, तेजस्वी आणि शामिताचे हे भांडण चाहत्यांचे किती मनोरंजन करेल.