छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ चा १५ वा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला (bigg boss 15 finale) आहे. शनिवारी महाअंतिम सोहळ्यास सुरुवात झाली असून शोच्या सर्व सीझनचे विजेते, १५ व्या सीझनमधील सर्व सदस्य आणि टॉप ५ स्पर्धकांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आहे. टॉप पाच स्पर्धकांमध्ये आज शोला विजेता मिळणार असून बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘बिग बॉस’ शोच्या १५ व्या सीझनमध्ये निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत. अशात आज विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी शोमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. अंतिम सोहळ्यावेळी वेळी बिग बॉसच्या सर्व सीझनच्या विजेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हे सर्व विजेते १० लाख रूपये घेऊन येणार आहेत.
यावेळी टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांसमोर अशी अटी ठेवण्यात येणार आहे की, कोणी एकाने १० लाख रूपये घेऊन फायनलमधून बाहेर पडावे किंवा बिग बॉस ट्रॉफीसाठी स्पर्धेत उतरावे. अशात १० लाख रूपये घेऊन स्पर्धेतून कोण बाहेर पडणार? हे शो प्रसारित झाल्यानंतरच कळणार आहे. याशिवाय बिग बॉस शोच्या विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तर बिग बॉस १५ ची ट्रॉफी कोण आपल्या नावे करेल? याचा खुलासा आज रात्री होणार आहे.
दरम्यान, बिग बॉस १५ मध्ये रश्मी देसाई वाईल्ड कार्डद्वारे एंट्री केली होती. त्यानंतर तिने टॉप ६ मध्ये आपली जागा मिळवली. पण फिनालेच्या पूर्वीच ती घराबाहेर पडली. त्यानंतर निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश टॉप ५ मध्ये पोहोचले. सोशल मीडियावर बिग बॉस सीझन १५ चा विजेता कोण होणार, याबाबत अनेक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.
शिवाय करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांपैकी एकजण बिग बॉस शोचा विजेता होऊ शकतो आणि ट्रॉफी जिंकू शकतो, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामुळे बिग बॉस शोचा अंतिम सोहळा फारच धमाकेदार होणार असून शोचा विजेता कोण होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यासोबतच बिग बॉस शोच्या विजेत्याला केवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळेल याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, समोर येत असलेल्या बातम्यांनुसार यंदाचा सीझन जिंकणाऱ्या विजेत्याला ५० लाख रूपये बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनय पाहून अनुपम खेर यांनी अल्लू अर्जूनचे केले कौतुक; म्हणाले, तू रॉकस्टार आहेस
अमृता फडणवीसांनी ‘नॉटी’ म्हणत ठाकरे सरकारच्या नेत्यांवर साधला निशाणा; म्हणाल्या…
पॉवर स्टार पुनित राजकुमारसाठी साऊथ इंडस्ट्रीने उचलले मोठा पाऊल, त्याच्या शेवटच्या चित्रपटावेळी..