भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून केला होता, असा खुलासा आता पीडित तरुणीने केला आहे.
पीडित तरुणीने चित्रा वाघ यांनी तिला खोटी बलात्काराची तक्रार द्यायला लावल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या संदर्भात तरुणीने सुरेश धस आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने वेगळ वळणं घेतलं आहे.
ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांच्यावर असे आरोप झाल्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्यावर याआधी देखील असे अनेक आरोप झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक आरोप प्रकरणात असेच आरोप पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले होते.
आता या नवीन प्रकारणामुळे चित्रा वाघ पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. मेहबूब शेख यांच्यावर बलात्कार करण्याचा आरोप करणाऱ्या पिडीतीने सांगितले की, चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसे बोलायचे हे शिकवले, तर धस यांनी जे लिहून दिलं ते मीडियासमोर बोलले.
पिडीतीने केलेल्या या आरोपामुळे आता चित्रा वाघ यांच्यासोबतच सुरेश धस यांच्याही अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात फक्त तक्रार दाखल आहे, गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणी मालेगाव येथील नगरसेवक नदीम याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालेले प्रकरण म्हणजे, या प्रकरणातील पीडिता ही खासगी क्लासेस घेत होती. मात्र मेहबूब शेख यांनी तिला नोकरीचे अमिष दाखवलं, असा आरोप तिने आधी केला होता. शेख यांनी एक ठिकाणी बोलवून गाडीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच हे प्रकरण कुणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही, अशी धडकी दिली, असा सनसनाटी आरोप काही महिन्यांपूर्वी या पीडितेने शेख यांच्यावर केला होता.