Share

‘होय मी गद्दारी केली आहे, पण आता…’; बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य, लोकांना कबुली देत म्हणाले…

bacchu kadu

प्रहार (Prahar) शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. बच्चू कडू अपंग व्यक्तींसाठी काम करताना दिसून येतात. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हाव म्हणून अनेक वर्षं संघर्ष केला. अखेर त्या लढ्याला यश आलं. यादरम्यान बच्चु कडू यांनी मोठा खुलासा केला आहे.

बच्चु कडू म्हणाले, मला गद्दार म्हणताय? होय, मी गद्दारी केली. पण ती केवळ दिव्यांगांसाठी. यामुळे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या अपंग -दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. माझी गद्दारी जनतेसोबत नसून, दीव्यांग व शेतकरी हितासाठी आहे. शेतकरी संघटनेतर्फे पाटोदा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळ्याला बच्चू कडू उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित होते. या मेळाव्यात बच्चू कडू यांच्या मातोश्री सौ. इंदुबाई कडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार देण्यात आला. राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार माजी सभापती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले‌. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर बोलतांना बच्चू कडू म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालो. त्यामुळे माझ्यावर सातत्याने टीका केली जात आहे. पण या गोष्टीचा मी विचार करत नाही.

तसेच, मी जर बंडखोरी केली नसती तर दिव्यांगासह विविध घटकांसाठी आज जे निर्णय होत आहेत ते झालेच असते का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.यादरम्यान शेतकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनाही पुरस्कार देण्यात आला. दरसवाडी-डोंगरगाव कालवा, कांद्याचे भाव, पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी या सर्व प्रश्नांकडे लक्ष घालण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

पाटोदा येथे भरवण्यात आलेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच रक्तदान शिबिरही भरवण्यात आले. त्याचवेळी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणी ही करण्यात आली. शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी व केलेल्या आंदोलनाची ही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच पालखेड कालवा व दरसवाडी धरणाची माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या, केवळ श्रेय घेऊ नका, असे म्हणत जाहीर आव्हान करण्यात आले.

म्हत्वाच्या बातम्या –

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now