Share

Shivsena: दसरा मेळाव्यात ठाकरेंना मोठा धक्का! २ आमदार, १ खासदार, १५ नगरसेवकांसह अनेक बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार

uddhav thakre eknath shinde

शिवसेना (Shivsena): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून ४० आमदार आणि १२ खासदार सोबत घेऊन गेले. नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वाद सुरु आहेत. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार? ठाकरे की शिंदे? यावरून वाद सुरु आहे.

अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे १०-१५ नेते दसऱ्याला शिंदे गटात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याचे समजले आहे. मुंबईतील १० ते १५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक खासदार, दोन आमदार दसरा मेळाव्यात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या जवळचा एक नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबईतील ४० नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यातील १० ते १५ नगरसेवक दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेता येऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मास्टर प्लॅन आखल्याची चर्चा आहे.

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य यानुसार शिवाजी पार्कच्या मैदानावर परवानगी दिली जात असल्यामुळे ठाकरेंना परवानगी मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाने डायरेक्ट शिवाजी पार्क मैदानच गोठवण्याची तयारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ठाकरेंची कोंडी करण्याचा एकही प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सोडलेला नाही.

आधी ४० आमदार आणि १२ खासदार आता त्यातही संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळच्या लोकांशीही शिंदेंनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. दसरा मेळावा घेण्याकरिता शिंदे गटाने प्लॅन बी म्हणून अनेक मोठमोठ्या मैदानासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटाने शिवाजी पार्कसाठी अर्ज केल्याने शिवाजी पार्कच्या परवानगीचा निर्णय गोठवला जाण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी एकही मैदान मिळू नये यासाठीही शिंदेंकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे आणि शिंदे दोन्ही गट दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्याकरिता आक्रमक आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या
Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकरांनी माफी मागीतली नाही तर त्यांना सडके मासे खाऊ घालू; कोळी महीला का संतापल्या? जाणून घ्या…
Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर
‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?

ताज्या बातम्या इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now