मुंबई | काही दिवसातच आता आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आपल्यापैकी अनेकांची आवडती टीम असेल. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
येत्या २७ मार्च रोजी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स पहिली मॅच खेळणार आहे. मात्र पहिला सामना खेळण्याआधीच मुंबई इंडियन्सला पराभव पत्कारावा लागणारा कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. आयपीएलचे पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
कारण, मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असून त्याची दुखापत अजूनही बरी झाली नाही. यामुळे सूर्यकुमार यादव आयपीएल २०२२ मधील सुरुवातीच्या काही लढतीत खेळू शकले कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये आहे. सुर्यकुमार यादवची सध्याची परिस्थिती पाहता तो आयपीएल २०२२ ची पहिली मॅच खेळण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. कारण बोर्डाच्या वैद्यकीय स्टाफने देखील त्याला स्पर्धेतील पहिल्या काही लढती खेळू नये असा सल्ला दिल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत सूर्यकुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानावर परत आला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमारला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी अजून काही वेळ द्यावा लागले. दुखापतीमुळेच तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकला नव्हता.
सूर्यकुमार यादव हा मुंबई संघातील महत्त्वाचा फलंदाज मानला जातो. कारण मुंबई संघातील स्टार फलंदाज म्हणून सूर्यकुमारकडे पहिले जाते. मात्र, आता आयपीएलच्या मालिकेत मुंबई इंडियन्समध्ये जर सूर्यकुमार यादव नसेल तर मुंबईचा संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आता सुर्यकुमार संघात परत येणार कि नाही? किंवा कधी येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
युपीत EVM घोटाळा? भाजपची सत्ता जाणार? 142 जागांसाठी पुन्हा निवडणूक? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य…
‘या’ कारणामुळे सुर्यकुमार यादव आयपीएल खेळणार नाही; मुंबईला मोठा धक्का
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची भरमैदानात गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडविणारा व्हिडीओ आला समोर
बाबा रामदेव यांच्या ‘या’ कंपनीने दिला गुंतवणूकदारांना तब्बल ४९५८ टक्के परतावा; १ लाखाचे झाले ५० लाख