मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने दोनवेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले.
महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर सरकारने मराठा समाजाला EWS कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला होता. आता या जीआरवर उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आला आहे.
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधीचा जीआर रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सोबतच मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. यावर मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. EWS अंतर्गत आरक्षण देण्याचा हा जीआर महाविकास आघाडीच्या सरकारने काढला होता.
आता महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्रातील या नवीन सरकारवर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणासंबंधीत काम पाहण्यासाठी एक समिती बनवण्यात आली होती.
या समितीचे अध्यक्ष म्हणुन काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली होती. अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रया दिली आहे. ते म्हणाले की, ‘एसईबिसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा निकाल अनपेक्षित आहे.
राज्य सरकारने त्यास तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी आमची मागणी आहे. निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर विस्तृतपणे बोलता येईल’.अशोक चव्हाण यांनी सरकारला उच्च न्यालयाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे, अशी मागणी केली आहे. आता महाराष्ट्र सरकार या निकालाविरुद्ध काय पावले उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या निर्णयामुळे मात्र मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
मध्यरात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा; लोकांनी जेसीबीवरून उधळली फुले
आनंद दिघेंसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार, जास्त बोलाल तर तोंड उघडेल; शिंदेंची ठाकरेंना थेट धमकी
‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’
राज्यपालांच्या समर्थनासाठी धावून आल्या चित्रा वाघ; म्हणाल्या ‘१७ सेकंदात २७ शिव्या देणारे…