politics : राज्यातील १०७९ ग्रामपंचायतींत निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये १६ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली. आता हळूहळू त्याचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी शिंदे सरकारमधील अनेक बडे नेते आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसते. महाविकास आघाडीचे उमेदवार हे या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये चांगलीच टक्कर सत्ताधारी गटातील उमेदवारांना देताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मात्र जबरदस्त धक्काच त्यांच्या मुळ गावात बसला आहे. भरत गोगावले यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील काळीज खरवली हे आहे. त्या ठिकाणची ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्याचे निकालातून स्पष्ट झाले. शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो.
खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत १३ ग्रामपंचायत सदस्य व १ सरपंच असे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे चैतन्य महामुनकर यांनी सरपंच पदाची बाजी मारली. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारा निकाल आल्याने शिंदे गटांमध्ये शांतता पसरली आहे.
समीर महामुनकर या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून त्या जागी चैतन्य महामुनकर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १० उमेदवार बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे निवडून आले. तरीही लोकांतून सरपंच निवडून येण्याच्या पद्धतीमुळे शिंदे गटालाच याचा मोठा फटका बसला.
लोकांमधून सरपंचपदी चैतन्य महामुनकर हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. भरत गोगावलेंना गावातच ग्रामस्थांनी अशा प्रकारे धक्का दिला. यापुढे आता लोकांमधून सरपंच निवडून येणार असल्याने अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या नेत्यांमध्ये नाना पटोले, के सी पडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, कपिल पाटील यांचा समावेश आहे. हळूहळू सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल स्पष्ट होतील. त्यानंतर कोणी गड राखला? व कोणत्या बड्या मंत्र्याला पराभवाचा सामना करावा लागणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
bjp : मुरजी पटेलांना उमेदवारी माघारी घ्यायला लावल्याने कार्यकर्ते संतापले; भाजपविरोधात घोषणाबाजी
bjp : भाजपने शब्द पाळताच राज ठाकरे झाले भावूक; म्हणाले प्रिय मित्र देवेंद्रजी तुम्ही…
Mohammad Shami : संघात नसतानाही शामी अखेरच्या षटकात गोलंदाजीला आला, अन् 4 विकेट्स घेत सामनाच फिरवला